विमानांना लागणार्‍या इंधनाचा काळाबाजार करणारे अटकेत!

 

पिंपरी : विमानांना लागणारे अतिज्वालाग्राही इंधन टँकरमधून काढून त्याची  काळ्याबाजारात विकणार्‍या एका टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट ४ च्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सोमाटणे फाट्यानजिक ६ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.

मंगेश सखाराम दाभाडे वय ४२ वर्षे, रा. भेगडेआळी, शनिवारपेठ, तळेगाव दाभाडे, पुणे, ईलाही सैफन फरास वय ४५ वर्षे रा. कलवडवस्ती मशिदीजवळ, फाळके चौक, धानोरी, पुणे, अनिल सतईराम जस्वाल वय २८ वर्षे रा. राणीसरांग, आजमगड, उत्तर प्रदेश, अमोल बाळासाहेब गराडे वय ३१ वर्षे रा. मु.पो. पिपंळखुटे ता. मावळ, जि. पुणे, परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड वय ३६ वर्षे रा. दाभाडेवस्ती, च-होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

काही व्यक्ती हे इंधन टँकरवाल्यांशी संगनमत करून ते टॅंकरमधून काढून घेत त्याचा काळाबार करत असल्याची माहिती पोलिसांना मिलाली होती. पोलीस या प्रकरणी लक्ष ठेवून होते. ६ मार्च रोजी तळेगाव दाभाडे पोलीसठाण्याच्या हद्दीत सोमाटणे फाट्यानजिक शांताई हॉटेलच्या बाजूस अशाप्रकारे इंधन काढून घेत असल्याची माहिती गुन्हेशाखा युनिट ४ च्या पथकाला मिळाली. पोलिसांनी तेथे छापा घातला व आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

आरोपींवर भा.दं.वि. कलम ३७९, २८५, ५११, ३४ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीसठाण्याकडे देण्यात आला आहे. 

आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ११ मार्च पर्यंत पोलीसकोठडी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपरआयुक्तवसंत परदेशी, उपआयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त गुन्हे सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक धनराज किरनाळे, सहायक उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, हवालदार प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, नाईक वासुदेव मुंडे, शिपाई प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली. 

विमानांना लागणार्‍या इंधनाचा काळाबाजार करणारे अटकेत! विमानांना लागणार्‍या इंधनाचा काळाबाजार करणारे अटकेत! Reviewed by ANN news network on ३/०८/२०२४ ०९:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".