शुक्रवार, १ मार्च, २०२४

माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने शनिवारी मोफत आरोग्य शिबीर

 


पिंपरी : पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने शनिवार दि. २ मार्च रोजी शहरातील नागरिकांसाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव येथील वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये अनियमित रक्तदाब,मधुमेह,हृदयरोग,बालरोग, त्वचाविकार, किडनीविकार,मेंदूचे आजार,कॅन्सर,व्हेरिकोज व्हेन्स व नेत्ररोग, काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्यांच्या मागचा पडदा,  तिरळेपणा, आदी आजारांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

यासाठी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व डॉ चाकणे आय हॉस्पिटल पिंपळे सौदागर यांचे सहकार्य लाभले आहे. शिबिराचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचाच्या करण्यात येणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अमित कुदळे ९६७३४९४१४९/ सचिन वाघेरे ९१४५४९४१४९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा