माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने शनिवारी मोफत आरोग्य शिबीर

 


पिंपरी : पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने शनिवार दि. २ मार्च रोजी शहरातील नागरिकांसाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तपोवन मंदिर रोड पिंपरीगाव येथील वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबीर होणार आहे. यामध्ये अनियमित रक्तदाब,मधुमेह,हृदयरोग,बालरोग, त्वचाविकार, किडनीविकार,मेंदूचे आजार,कॅन्सर,व्हेरिकोज व्हेन्स व नेत्ररोग, काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्यांच्या मागचा पडदा,  तिरळेपणा, आदी आजारांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

यासाठी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व डॉ चाकणे आय हॉस्पिटल पिंपळे सौदागर यांचे सहकार्य लाभले आहे. शिबिराचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचाच्या करण्यात येणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी अमित कुदळे ९६७३४९४१४९/ सचिन वाघेरे ९१४५४९४१४९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.


माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने शनिवारी मोफत आरोग्य शिबीर माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने शनिवारी मोफत आरोग्य शिबीर Reviewed by ANN news network on ३/०१/२०२४ ०३:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".