रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार दि. 19103/2024 रोजी 00.01 वाजता पासून ते दे. 02/04/2024 चे 24.00 वा. पर्यत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केला आहे.
12 मार्चपासून मुस्लिम धर्मीयांचा रमजान सण तसेच दि 14मार्चपासून जिल्ह्यात शिमगोत्सव सुरु झालेला आहे, दि. 28 मार्च रोजी शिवजयंती त्यानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचे तसेच मिरवणुकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. व दि. 30 मार्च रोजी रंगपंचमी हा सण साजरा होणार आहे. दि.
16 मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते, तसेच जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुबई-गोवा क्र. 66 चे काम पर्णन झाल्याचे निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्यच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार दि. 19103/2024 रोजी 00.01 वाजता पासून ते दि. 02/04/2024 चे 24.00 वा. पर्यत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रेे हत्यारे किंवा शस्न फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शंतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबीकरिता लागू होणार नाहीत. 1) अंत्ययात्रा 2) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी 3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी 4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२४ ०८:१०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: