पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे टेक्निकल इन्सिटटयुट पुणे आणि मोरोपंत पिंगळे गोधन फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील सावरकर सभागृहात ' गाईच्या शेणापासून रंगनिमिंती ' या विषयावर एक दिवसाच्या तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
गोपालन व्यवसाय हा एखाद्या औद्योगिक व्यवसायाप्रमाणे कसा यशस्वी करता येईल, त्यातून रोजगाराच्या संधीची निर्मिती, परसबागेत शाश्वत हरितऊर्जा निर्मिती, सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती, मातीची सुपीकता वाढवने वजनाने हलक्या अशा बांधकाम साहित्याची निर्मिती, पर्यावरणपूरक उष्णता प्रतिरोधक विटांची निर्मिती, खेमरा आणि गोमूत्र आधारित पर्यावरण पूरक रंगनिर्मिती इत्यादी विषयावर चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन होणार आहे.
Reviewed by ANN news network
on
२/१४/२०२४ ०४:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: