पुणे :जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघातर्फे पथारी विक्रेत्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे.जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.रणजीत सोनावळे, आनंद शिंदे,माया पंडित योगिता दिवसे, तेजस जोगदंड इत्यादी पदाधिकारी अभियानात सहभागी झाले आहेत.
पथारी विक्रेत्यांमध्ये एकता, बंधुभाव, सदभावना व शिस्त निर्माण करुन व्यवसायाबाबत येणाऱ्या अडीअडचणी दुर करुन त्यांचे हक्क, अधिकार व कर्तव्य यांची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत.
शासनाकडुन आलेले निर्णय, आदेश मागदर्शक तत्वे पथारी विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यासाठी चालू परिस्थितीचे अद्ययावत माहिती विक्रेत्यांमध्ये पोहचविण्यात येणार आहे. व्यवसायविषयक धोरणांची व्यवसायीकांना जाणीव करुन शासनाला त्यांच्या धोरणांच्या अंमल बजावणीला भाग पाडणेसाठी व विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायात भेडसावणाऱ्या सद्यपरिस्थिती व भविष्यकालीन व्यवसायीकांना समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्व सामान्य गोरगरीब व्यवसायीकांना न्याय, हक्क, अधिकार मिळवुन देण्यासाठी एकत्र येऊन आपला हक्क मिळवण्यासाठी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघामध्ये, अभियानात मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा