विठ्ठल ममताबादे
उरण : दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने १८ फेब्रुवारी व १९ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन उरण मध्ये करण्यात आले.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते १२ - द्रोणागिरी गडाची सफाई आणि सजावट. दुपारी २ ते ५ - रक्तदान शिबीर ठिकाण विमला तलाव येथे संपन्न झाले. यावेळी रक्तदात्यांनी मोठया प्रमाणात रक्तदान केले.सायं. ४ वा. - गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरने.सायं. ७ वा. - महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंग स्नान ठिकाण विमला तलाव.सायं. ८ ते ९.३० - मशाल फेरी आणि दिपोत्सव ठिकाण विमला तलाव तर दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. - बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलवणे (विमला तलाव),सकाळी ८.०० वा. - शिवप्रतिमा पूजन (विमला तलाव),सकाळी ९.०० वा. - प्रतिमा मिरवणूक, शिवराज्याभिषेक, दुर्ग पूजन, पोवाडा, व्याख्यान आणि मान्यवरांचे स्वागत तसेच शिवभोजन.सायंकाळी ४.०० वा. - गडावरून खाली उतरणे,सायं. ५.०० वा. निरोप समारंभ असे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग, आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर चारफाटा, योगा विथ पूनम ग्रुप, सीआयएसएफ स्टाफ उरण, डाऊरनगर ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मित्र परिवार आदी संस्थानी विशेष मेहनत घेतली. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागच्या वतीने द्रोणागिरी गडावर पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यंदाचे हे उत्सवाचे ५ वे वर्षे होते. यावर्षी भाविक भक्त, शिव भक्त या शिवजन्मोत्सवात मोठया संख्येने सहभागी झाले होते. शिवजन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच कार्यक्रमांना जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अशी माहिती दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कावले, उरण विभाग अध्यक्ष आणि सर्व कार्यकारणी आणि सदस्यांनी दिली.
दुर्गमावळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Reviewed by ANN news network
on
२/१९/२०२४ ०४:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: