चिरनेर गावात शिवरायांना अभिवादन

 

जय शिवाजी, जय भवानीचा जय घोष

उरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथील श्री महागणपती तीन आसनी ऑटो रिक्षा चालक-मालक संस्थेच्या वतीने संस्थेचा पाचवा वर्धापन दिन व शिवजयंतीच्या निमित्ताने  श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. 

पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या भव्य मैदानावर सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजाअर्चा व पुष्पहार अर्पण करून, पूजन करण्यात आले. यावेळी महाराजांना अभिवादन करून, भगवा फडकविण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करण्यात आला. जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने  वातावरण शिवमय झाले होते. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली. यावेळी शिवभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. 

कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, शेकापचे सुरेश पाटील, भाजपचे उरण तालुका खजिनदार सुशांत पाटील, इंटकचे  उरण तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, चिरनेर ग्रा. पं. सदस्य अरुण पाटील, चिरनेर ग्रा. पं. सदस्य समीर डुंगीकर, विधणे ग्रा.पं. सदस्य सुरज म्हात्रे, जयेश खारपाटील, चेतन चौलकर, गजानन केणी तसेच अन्य कार्यकर्ते व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिरनेर गावात शिवरायांना अभिवादन चिरनेर गावात शिवरायांना अभिवादन Reviewed by ANN news network on २/१९/२०२४ ०४:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".