निगडी : माणूसकी फाऊंडेशन पिंपरी चिंचवड शहर आणि सुवर्णयुग मित्र मंडळ यमुनानगर, निगडी ,प्राधिकरण तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
न्यू पुणे पब्लिक स्कूल तर्फे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साम्बो (रशियन कुस्ती) स्पर्धेत ५२ किलो कमी वजन गटात चि. हेरंब अभिनंदन कुमठेकर याने सुवर्णपदक पटकावले. पिंपरी चिंचवड चे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याबद्दल उद्योजक श्री. विवेक कोलते यांच्या हस्ते हेरंब चा सत्कार करण्यात आला.
माणुसकी फाऊंडेशन आणि सुवर्णयुग मंडळाचे कार्यकर्ते आणि यमुनानगर परिसरातील नागरिक याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.
हेरंब कुमठेकर याचा सत्कार
Reviewed by ANN news network
on
२/१९/२०२४ १०:३२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: