खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यातून प्रश्न निकाली
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील तळोजा सेक्टर 34 आणि 36 येथील 2019 मध्ये लॉटरीत घर जिंकलेल्या चार हजार लाभार्थ्यांना लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे. वाढीव रक्कम देखील कमी केली जाणार असून लवकरच घरांचा ताबा दिला जाणार आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
लॉटरीमध्ये घर लागलेल्या लाभार्थ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. आपले गा-हाणे मांडले. त्यानंतर खासदार बारणे यांनी तत्काळ सिडकोचे व्यस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्यासोबत बैठक घेतली. डिग्गीकर यांनी तातडीने घरांचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे उपस्थित होते.
लाभार्थ्यांना बँकेच्या कर्जाचे हप्ते, व्याज तसेच घराचे भाडे असा आर्थिक भार पडत आहे. सोडतीच्यावेळी सांगितल्यापेक्षा ईडब्ल्यूएस आणि एलआयजी सदनिकेच्या किमती वाटप पत्रात वाढवून दिल्या आहेत. या दोन्ही क्षेत्रातील प्रति तीन ते पाच लाखाची वाढ करण्यात आली असून आर्थिक आव्हानात भर पडली आहे. भरमसाठ वाढ करुन भरुन घेतलेली रक्कम लाभार्थ्यांना पुन्हा मिळावी. विलंब करुन प्रतिदिवसाच्या आकारलेल्या दंडाची नुकसान भरपाई देण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली
Reviewed by ANN news network
on
२/२२/२०२४ ०८:१६:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: