विठ्ठल ममताबादे
उरण : माघ शु.४,विनायक चतुर्थी (अंगारक योग ) १३ फेब्रुवारी २०२४ रोजी गणेश जयंती निमित्त हजारो भाविकांनी चिरनेर महागणपतीचे दर्शन घेतले.पहाटे ३ : ०० वाजल्यापासून श्रींच्या दर्शनाला प्रारंभ झाला.
उरण,पनवेल,नवीमुंबई, ठाणे,मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणचे भक्तगण या गणेश जयंती निमित्त चिरनेर मुक्कामी श्रींचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने दाखल होते.दर्शनासाठी अधिक वेळ लागत होता.मात्र तरीही गणेश भक्तांनी रांगेतच दर्शन घेणे पसंत केले होते.
नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारे दैवत म्हणून चिरनेर महागणपतीची अनुभूती असल्याने प्रचिती येणारे भाविक आपल्या मनोकामना पूर्णतःवास नेण्यासाठी या चिरनेरच्या महागणपतीला नतमस्तक होण्यासाठी सालाबाद प्रमाणे चिरनेर मुक्कामी दाखल होतांना पाहावयास मिळत होते.
त्यामुळे गणपती देवस्थाच्या विश्वस्त मंडळानी भक्तांना योग्य रीतीने श्रींचे दर्शन घेता यावे यासाठी सर्व व्यवस्था सज्ज ठेवली होती.
चिरनेर गावात या गणेश जयंती निमित्त सारा गाव भक्तीभावाने गजबजून गेला होता.नोकरी धंद्या निमित्त वर्षभर बाहेर असल्या बहुतांशी व्यक्ती या दिवशी महागणपती चरणी नतमस्तक होण्यासाठी आपल्या मूळ गावी येत असतात.तर उरण तालुक्यासह पनवेल पेण तालुक्यातील ग्रामीण परिसरातील तरुण वर्गातील भक्तगणांच्या पायी दिंड्या दाखल झाल्या होत्या.एकंदरीत कोरोना महामारी काळानंतर ३ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर या गणेशोत्सवाचा पूर्वीचा जोश आत्ता पूर्ववत झाल्याचे दिसत होते.
गणेश जयंती निमित्त चिरनेर परिसरातील तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या खेळणी,महिलांचे सौंदर्य प्रसाधने साहित्य,मिठाई तसेच अन्य लहान - सहान व्यवसायिकांच्या धंद्याला उभारी मिळाल्याने एकूणच यंदाचा माघी गणेशोत्सव अत्यंत आनंदात भक्तीभावाने साजरा करण्यात आला असून या निमित्ताने हजारो भाविकांनी चिरनेर महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
गणेश जयंती निमित्त हजारो भाविकांनी घेतले चिरनेर महागणपतीचे दर्शन
Reviewed by ANN news network
on
२/१३/२०२४ ०८:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: