विठ्ठल ममताबादे
उरण : नवी मुंबई येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित मुंबई विभागीय शालेय एस्टेडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
विविध गटामध्ये या स्पर्धा झाल्या. सिया निनाद फोफेरकर(चिरनेर- तालुका उरण )हिने शिवकला या प्रकारात गोल्ड मेडल पटकाविले असून तिची निवड भंडारा येथे राज्यस्तरीय अश टे डो आखाडा स्पर्धेसाठी झाली आहे.सिया फोफेरकर ही विद्यार्थी आर के एफ(जे एन पी टी) शाळेमध्ये शिकत असून इयत्ता नवावी या वर्गात आहे.तिला राजु कोळी, गोपाल म्हात्रे,रोहित घरत, राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष कवळे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा घेण्यात आली. सिया फोफेरकर हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तीचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
सिया फोफेरकर हिची राज्यस्तरावर निवड
Reviewed by ANN news network
on
२/१३/२०२४ ०८:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: