पुणे : "कमळावर बसून आलेल्या लक्ष्मीचा भारताला शुभाशिर्वाद असल्याने पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वामुळे शनिची प्रतिकुलता आता राहणार नाही " असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहर प्रसिध्दी आणि प्रचार सहप्रमुख हेमंत लेले यांनी केले. बीजेपी ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या सांस्कृतिक आघाडी तर्फे घेण्यात आलेल्या 'सेल्फी विथ लोटस' स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळयात प्रमुख अतिथी या नात्याने श्री.लेले बोलत होते.याप्रसंगी त्यांनी बीजेपीच्या स्थापनेपासुनच्या झंझावाती वाटचालीचा धावता आढावाही घेतला.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर अध्यक्ष पोपटलाल गायकवाड होते.याप्रसंगी बीजेपीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा लेले, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग , ज्येष्ठ नागरिक आघाडीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते. पोपटराव गायकवाड यांनी समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात , नजीकच्या काळातील निवडणुकीत कार्यकर्त्यांनी बीजेपीला निर्विवाद यश मिळण्यासाठी आपले मौलिक योगदान द्यावे असे आवाहन केले. याप्रर्संगी श्रीनिवास तेलंग यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. याच सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते सांस्कृतिक आघाडीच्या पदाधिका-यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा तसेच डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित 'डहाळी' विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. विलास दातार यांनी ईशस्तवन केले.कार्याध्यक्ष प्रिया दामले आणि निमंत्रक रवि सरनाईक यांनी अतिथी स्वागत केले.उपाध्यक्ष सारिका सासवडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजन सरचिटणीस विठ्ठल मुरकेवार, उपाध्यक्ष शशिकांत ढोणे, निमंत्रक सुनीता साठे आणि अपर्णा आंबेडकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेते ॲड.संगीता कुलकर्णी, डाॅ.दीपक देशपांडे , सुनीता निजामपूरकर, मोहन खटावकर, कमलाकर भोंडे, अनघा सावनुर आदिंची मनोगतपर भाषणे झाली.
शहर कोषाध्यक्ष तुळशीराम उणेचा, उपाध्यक्ष विजय शिंदे, पुरुषोत्तम पिल्ले रविन्द्र भगवान आदिंनी नवनिर्वाचित पदाधिका-यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक कार्यकर्त्याने सूर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन विश्वकल्याणाची संकल्पना प्रत्यक्ष साकार होण्यासाठी सतत योगदान देत रहावे असे प्रतिपादन डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात केले.
Reviewed by ANN news network
on
२/१०/२०२४ ०७:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: