विठ्ठल ममताबादे
उरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण तालुक्यातील पागोटे युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली, यामध्ये युवासेना शाखा अध्यक्ष साईराज सिकंदर पाटील, उपाध्यक्ष दौलत प्रकाश पाटील, खजिनदार प्रथम कृष्णकांत तांडेल व सेक्रेटरी रोशन भगवान म्हात्रे यांची निवड करण्यात आली.या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी युवासेनेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदर वेळी पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच पागोटे कुणाल अरुण पाटील,युवासेना नवघर उपविभागप्रमुख कुमार जोमा मढवी, ग्रामपंचायत सदस्य मयूर भालचंद्र पाटील, हेमंत पाटील, शाखाप्रमुख महेंद्र पाटील,उपशाखाप्रमुख महेश पाटील, खजिनदार मनोहर तांडेल, सेक्रेटरी प्रदीप पाटील, शिवसेना शाखा सल्लागार रमेश पाटील, माजी शाखाप्रमुख अनिल पाटील, ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, खजिनदार ऋषिकेश म्हात्रे, नितीन पाटील,दिपक पाटील,अरुण पाटील,कैलास पाटील,धीरज पाटील,आकाश म्हात्रे,प्रदिप गो. पाटील,विनय पाटील,डॉ.प्रेम पाटील,रूपेश पाटील,राहुल पाटील,सम्राट अ.पाटील,गौरव पाटील,पंकज पाटील,चंद्रकांत पाटील, निखिल तांडेल,पागोटे शाखेचे सर्व शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. तसेच उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक किसन म्हात्रे, द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील व बाळू सकपाळ हेही उपस्थित होते.
पागोटे युवासेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार मनोहर भोईर यांची भेट
Reviewed by ANN news network
on
२/१०/२०२४ ०४:४४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
२/१०/२०२४ ०४:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: