विठ्ठल ममताबादे
उरण : प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वशेणी येथील शेतकऱ्यांच्या बैठकीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला.
शासन आम्ही घेतलेल्या हरकतीवर कोणतेही उत्तर न देता जर जबरदस्ती ने भूसंपादन करणार असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही.तसेच शेतकऱ्यांनी कोणीही जमीन विकण्याची घाई करू नका असे मत वशेणी ग्रामपंचायतचे सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले.शासन जर जबरदस्तीने हा प्रकल्प या विभागात राबवत असेल तर तीव्र आंदोलन छेडून प्रसंगी जेल मध्ये जावं लागलं तरी बेहत्तर कारण आमचा इतिहास हा संघर्षाचा आहे पण हा प्रकल्प परतवला जाइल असे मत वशेणी ग्रा.प.सदस्य संग्राम सुनिल पाटील यांनी व्यक्त केले. .
यावेळी सारडे ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील, माजी सरपंच चंद्रशेखर पाटील, प.स.सदस्य लवेश म्हात्रे, माजी सरपंच रत्नाकर गावंड , शेवंती पाटील , अस्मिता पाटील , प्रिती पाटील , रसिक भोईर ,रमाकांत गावंड , यशवंत ठाकूर ,मनोज पाटील आदी उपस्थित होते.या सभेसाठी सारडे , वशेणी , पुनाडे गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी एमआयडीसी प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध केला. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एमआयडीसीचा प्रकल्प सारडे, वशेणी, पुनाडे येथे राबविला जात असल्यामुळे तसेच ग्रामस्थांच्या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने शासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये मोठया प्रमाणात संतापाचे वातावरण पसरले आहे.
एमआयडीसी प्रकल्पाला सारडे, वशेणी, पुनाडे ग्रामस्थांनी केला विरोध
Reviewed by ANN news network
on
२/११/२०२४ ०४:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: