डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी कडून आयोजन
आंबी:डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी(आंबी ,पुणे ) च्या वतीने आयोजित 'होनहार भारत -लीडरशिप माईंडसेट ' या संकल्पनेवर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी बार्कलेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वूक्कलम,डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी(आंबी ,पुणे ) च्या कुलगुरू डॉ.सायली गणकर,तेलंगण मधील ज्येष्ठ पोलीस अधिकारी महेश भागवत, डॉ.जयंत चांदोरकर,प्रवीण फुटाणे,श्रीकांत ढवळे,मनोज सोनावाला यांच्या उपस्थितीत झाला.
शाश्वत आर्थिक प्रगती,सामाजिक विकास,पर्यावरण संवर्धन,सुशासन अशा विषयावरील मार्गदर्शन सत्रे,उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार असे या राष्ट्रीय परिषदेचे स्वरूप होते.एकूण ४० वक्ते,१ हजार मान्यवर आणि विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले.सर्व मार्गदर्शन सत्रे आंबी शैक्षणिक संकुलात पार पडली.'होनहार भारत' राष्ट्रीय परिषदेचे हे दुसरे वर्ष होते.
१० फेब्रुवारी या परिषदेच्या तिसऱ्या दिवशी तेलंगणातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी महेश भागवत, डॉ.जयंत चांदोरकर,प्रवीण फुटाणे,श्रीकांत ढवळे,मनोज सोनावाला आदी मान्यवर सहभागी झाले.डॉ.मोहन दास यांनी सूत्रसंचालन केले,डॉ.सुनील हरिर यांनी आभार मानले.
'सुशासन -गुड गव्हर्नन्स या विषयावर महेश भागवत यांनी मार्गदर्शन केले.या विषयांवरील चर्चासत्रात डॉ जयंत चांदोरकर,श्रीकांत ढवळे,प्रवीण फुटाणे,मनोज सोनावाला यांनी सहभाग घेतला.डॉ सायली गणकर यांनीही मार्गदर्शन केले.समारोप कार्यक्रमात बार्कलेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वूक्कलम सुशासन आणि बँकिंग सेक्टर मधील चांगल्या प्रथांची माहिती दिली.
Reviewed by ANN news network
on
२/११/२०२४ ०३:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: