श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हेमंत पवार यांची देणगी
विठ्ठल ममताबादे
उरण : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपत आजही विविध सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरूच आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हेमंत पवार यांच्या तर्फे खालापूर पोलीस स्टेशनला संगणक, कीबोर्ड, माऊस सीपीयू,युपीएस असे दोन नग,२ खुर्च्या भेट दिले.
सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थीने वृत्तीने साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यात कुलस्वामी ग्रुप ४५५० या ग्रुपचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. श्री शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला अत्यावश्यक साहित्य मिळाल्याने मिलिंद खोपडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे यांनी तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था व कुलस्वामिनी ग्रुप ४५५० चे मनापासून आभार मानले.
खालापूर पोलीस स्टेशनला संगणक व खुर्च्या भेट
Reviewed by ANN news network
on
२/२४/२०२४ ०३:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: