पुणे : पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्गाची चाचणी सोमवारी घेण्यात आली. या चाचणी दरम्यान मेट्रो मुठा नदीपात्राखालून धावली. चाचणी यशस्वी झाल्याचे मेट्रोचे व्य्वस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.
पुणे मेट्रोचे काम ९८ टक्के पूर्ण झाले असून शिल्लक काम वेगाने सुरू आहे.पुणे मेट्रोमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (१७ किमी) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (१६ किमी) असे ३३ किमी लांबीचे २ मार्ग आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक (७ किमी) आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक (५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक ६ मार्च २०२२ रोजी झाले. फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक (६ किमी) आणि गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक (४.७५ किमी) या मार्गांचे उदघाटन दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होऊन तो प्रवाश्यांसाठी खुला करण्यात आला.
सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते स्वारगेट स्थानक या चाचणी मार्गावरील सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदी पात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणे ही पुणे शहरात होणारी ऐतिहासिक घटना आहे. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक ३३.१ मी खोल, बुधवार पेठ स्थानक ३० मी खोल, मंडई स्थानक २६ मी खोल आणि स्वारगेट स्थानक २९ मी खोल आहे.
हा मार्ग चालू झाल्यानंतर येत्या काही महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक असा प्रवास करणे श

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: