बाबू डिसोजा कुमठेकर
भोसरी : शालेय अभ्यासक्रमा बरोबरी दैनंदिन व्यवहारातील व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी श्री टागोर शिक्षण संस्थेचे लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर व श्री टागोर माध्यमिक विद्यालया मध्ये विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजार हा उपक्रम भरवण्यात आला होता. विद्यालयातील अर्थव समुखराव,श्रवणी काळे ,निशा चव्हाण ,प्रेम सोनार ,उत्कर्ष. ननवरे,प्रेम जावळे, रामतीर्थे, कुंभार शेख.सैय्यद कांबळे ,शिंदे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आठवडा बाजारमध्ये कोणी किराणा,कांदे ,बटाटे ,मिरच्या , पालेभाज्या,खाऊ ,कापड ,कडधान्ये, वडापाव थंडपेय व इतर प्रकारचे स्टॉल लावले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार लांडे पाटील यांनी या उपक्रमातून मुलांना नफा तोटा ,बचत ,आर्थिक देवाण-घेवाण,वजन मापे ,मिली लिटर , डझन , शेर ,पायली ,या देवघेवाणीतून शालेय अभ्यास क्रमातील बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार भागाकार करायला मुले शिकतील येवढेच नव्हे तर आवक , जवक मागणी ,पुरवठा वर मालाची किंमत कशी राहते हे पण विद्यार्थ्यांना या उपक्रमातून त्यांना माहिती मिळेल या उपक्रमा बद्दल सर्व मुलांचे व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.या उपक्रमात मुलांना समाजातील व्यवहारिक जीवनामध्ये वस्तूंची व आर्थिक देवाणघेवाण नफा तोटा याची ही जाणीव त्यांना झाली. यामधून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयातील शिक्षकांनी केले. विद्यालयातील शिक्षक दिलीप पाटील, संतोष सुलाखे ,विठ्ठल बुळे ,जागृती ठाकरे, रवी खंदारे, संतोष सुलाखे , रवी थोरात,माया पाटोळे , कांबळे सर ,मस्तुद आबा, पल्लवी कौटे,एकनाथ जाधव , सागर हिरवे व सूर्यकांत राठोड ,दिपाली दाभाडे,मनीषा सोनवणे, माधुरी बांडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
या आठवडा बाजाराविषयी टागोर शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश फलके यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. आठवडा बाजारा साठी नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत आगे व संतोष काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
भोसरी येथील श्री टागोर शिक्षण संस्थेत "आठवडा बाजार " भरला
Reviewed by ANN news network
on
२/१३/२०२४ ११:५९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: