पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर करंडक आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. पिंपरी चिंचवडच्या पोलीस उपयुक्त स्वप्ना गोरे आणि लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि गीतकार दिग्ग्पाल लांजेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोणत्याही यशस्वी कामाच्या मागे कोणतीही एक व्यक्ती नसते तर ते संपूर्ण टीमचे यश असते, असे प्रतिपादन स्वप्ना गोरे यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कर्मवीर करंडक या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या कि यशस्वी व्यक्तींचे अस्तित्व विद्यार्थ्यांचे आयुष्य सकारात्मक बनवीत असते आणि त्यातील शिक्षकांचा वाटा अधिक असतो.
मराठी चित्रपट सृष्टीतील लेखक,दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार दिक्पाल लांजेकर यांनी पथनाट्य स्पर्धचे कौतुक केले कारण सध्या नाटक, एकांकिका आणि पथनाट्य यातील लोकांचा सहभाग कमी होत चालला आहे. त्यामुळे अशा स्पर्धा भरविल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले. तसेच यशाचा कोणताही शॉर्ट कट नसतो कारण यश मिळविण्यासाठी कष्टाला पर्याय नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहून त्यातील चांगल्या गोष्टी अवगत करून आपले आयुष्य घडवावे.
पारितोषिक वितरणास शिवरायांचा छावा या चित्रपटातील भूषण पाटील, अभिषेक, आणि तृप्ती तोरडमल उपस्थित होते.
विजेते संघ खालीलप्रमाणे
सिंहगड इन्स्टिट्यूट, वडगाव प्रथम क्रमांक,के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक द्वितीय क्रमांक तसेच नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे तृतीय क्रमांक तसेच अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले आणि रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत, यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. याशिवाय, सिंहगड इन्स्टिट्यूट च्या सुशांत बागुलने उत्कृष्ट अभिनय पुरुष, आणि NBN सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या, आंबेगाव मधील अंकिता निंबाळकर हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी केले आणि आभार रयत विद्यार्थी मंचाचा प्रतिनिधी ओंकार भोईर यांनी मानले.
कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग आणि रयत विद्यार्थी मंच यांनी केले होते.
या कार्यक्रमास डॉ. रमेश रणदिवे, डॉ. देवकी राठोड, माजी विद्यार्थी सूर्यकांत सरोदे, राजू काळे, ऋषिकेश कानवटे, दिव्या जोशी व इतर सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षककेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: