महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये संरक्षक जाळी बसवा, सुरक्षा उपाययोजना करा : शंकर जगताप

 


पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये सुरक्षा कठडे, खिडक्यांना सुरक्षा जाळ्या, उंच इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर आडवी संरक्षक जाळी, औषधोपचाराची पेटी तसेच इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांनी केली आहे.

यासंदर्भात शंकर जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "महापालिकेच्या चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर शाळेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या शाळेतील आठवीचा विद्यार्थी सार्थक कांबळे हा शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही महानगरपालिकेला विचार करायला लावणारी घटना आहे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी अत्यंत गोरगरीब घरातील असतात. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. चिंचवडगावातील हुतात्मा चापेकर शाळेत घडलेली दुर्दैवी घटना पुन्हा महानगरपालिकेच्या अन्य कोणत्याही शाळेत घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्क होऊन आवश्यक उपाययोजना करावी.

महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरक्षा कठडे, खिडक्यांना सुरक्षा जाळ्या बसवावेत. महानगरपालिकेच्या बहुतांश शाळांच्या इमारती उंच आहेत. या उंच इमारतींमध्ये लहान मुले शिक्षण घेत असतात. मुले खोडकर असणे हे नैसर्गिक आहे. या खोडकरणातून एखादी दुर्दैवी घटना घडू शकते, याची या निरागस मुलांना कल्पना नसते. त्यामुळे खोडकरणातून एखादी घडलेली दुर्दैवी घटना टाळण्यासाठी महानगरपालिका शाळांच्या उंच इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर आडवी संरक्षक जाळी सर्वात आधी बसविण्यासाठी खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी. त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये औषधोपचार पेटी व इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनाही व अग्निशमनासाठीची उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे."

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये संरक्षक जाळी बसवा, सुरक्षा उपाययोजना करा : शंकर जगताप महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये संरक्षक जाळी बसवा, सुरक्षा उपाययोजना करा : शंकर जगताप Reviewed by ANN news network on २/१७/२०२४ ०७:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".