पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागातंर्गत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक विद्यालय केशवनगर विद्यालयातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कै. सार्थक हर्षवर्धन कांबळे याचा १६ फेब्रुवारी २०२४ रोजी शाळा सुरु असताना विद्यालयातील जिन्याच्या दुसऱ्या मजल्यावरील रेलींगवरुन घसरुन तळमजल्यावर खाली पडुन मृत्यु झाला आहे. त्याबाबत महापालिकेच्या वतीने मृत्यु झालेल्या विदयार्थ्याच्या पालकांना आर्थिक मदत म्हणुन ५ लाख रुपये इतकी रक्कम शासनाची मंजुरी घेऊन अदा करण्यात येणार आहे. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णयानुसार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत १ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र शासनामार्फत मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना देण्यात येणार आहे, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज १६ फेब्रुवारी २०२४ रोजी घोषित केले आहे.
Reviewed by ANN news network
on
२/१७/२०२४ ०८:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: