विठ्ठल ममताबादे
उरण : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सध्याचे थंडीचे दिवस लक्षात घेता थंडी पासून नागरिकांचे रक्षण व्हावे या अनुषंगाने उरण तालुक्यातील नवघर रोड येथील झोपडपट्टीतील गरजू नागरिकांना गरम चादरी (ब्लॅंकेट)चे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, ओमकार म्हात्रे,सुमित कोळी, नितेश पवार, जुगल कोळी तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. गरजू नागरिकांना ब्लॅंकेट मिळाल्याने आनंद व्यक्त करत नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे आभार मानले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ब्लॅंकेटचे वाटप
Reviewed by ANN news network
on
२/१९/२०२४ ११:५७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: