पुणे : 'मातृमंदिर संस्थे'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूहगान स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम : अहिल्यादेवी मुलींची शाळा, पुणे
द्वितीय : पंडित बच्छराज व्यास विद्यालय, नागपूर
तृतीय : ज्ञानगंगा विद्यानिकेतन, संगमनेर
उत्तेजनार्थ : स्वस्तिक विद्यालय, गोवा
'भव्य दिव्य भारता, सार्वभौम भारता' हे गीत शाळेतील १४३६ विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे गायले. पर्यवेक्षिका चारुता प्रभूदेसाई यांनी या गीताचे लेखन केले, तर मानसी देशपांडे यांनी संगीतबद्ध केले. मुख्याध्यापिका अनघा डांगे, शिक्षिका वैशाली सोनवणे आणि अमृता सबनीस यांनी मार्गदर्शन केले.
समूहगान स्पर्धेत अहिल्यादेवी प्रशालेला विजेतेपद
Reviewed by ANN news network
on
२/१८/२०२४ ०४:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: