इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास वीज आणि पाणीपुरवठा करणार खंडित

 


पुणे : पुणे महापालिका हद्दीतील सर्व इमारतींमध्ये इमारत मालकांनी आणि भोगवटादारांनी आग प्रतिबंधक उपाययोजना करून त्या कार्यान्वित ठेवाव्यात. याबाबतचे मान्यताप्राप्त एजन्सीने दिलेले प्रमाणपत्र पालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांकडे सादर करावे. तसे न केल्यास संबंधित इमारतीचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.


महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६' हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून अधिनियमातील कलम ३ ( १ ) प्रमाणे कोणत्याही इमारतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे तसेच कलम ३ (३) नुसार, लायसेन्स प्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांना व आस्थापनांना जसे ( उदा. उंच निवासी इमारती, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह, रुग्णालये, शैक्षणिक, वाणिज्यिक व्यापारी संकुले, मॉल्स, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये इत्यादी ) कळविण्यात येते कि, आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कलम ३ पोट कलम ( १ ) मध्ये विनिर्धिष्ट केल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इमारतीमध्ये बसविलेल्या आग प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित व सुस्थितीत ठेवावी व याबाबतचे लायसेन्स प्राप्त एजन्सीकडील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र ( फॉर्म बी ) मुख्य अग्निशमन अधिकारी यांना वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै या महिन्यांमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती अग्निशमन केंद्र, महात्मा फुले पेठ, न्यू टिंबर मार्केट, पुणे-४११०४२ या ठिकाणी सादर करावे. सदर ( फॉर्म - बी) वेळेत सादर न केल्यास व भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी त्या इमारतीचा मालक किंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची राहील याची नोंद घ्यावी. सदर प्रकरणी विहित मुदतीत आग प्रतिबंधक उपाययोजना सुस्थितीत असले बाबतचा फॉर्म "बी" सादर न केल्यास 'महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६' च्या कलम ८ (२), नियम ११ ( १) नुसार अग्निशमनाच्या दृष्टीने सुरक्षित नसणाऱ्या इमारतींचा सदर आस्थापनांचा पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा बंद करण्यासारखी कारवाई करण्याची शिफारस करणे क्रमप्राप्त राहील. लायसेन्स प्राप्त अभिकरणांची यादी maharashtrafireservice.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच ज्या इमारतींमध्ये आवश्यक असणारी अग्निशमन यंत्रणा बसवलेली नाही त्यांनी तत्काळ लायसेन्स प्राप्त एजन्सीकडून बसवून घेऊन त्यानुसार प्रमाणपत्र विहित कालावधीत अग्निशमन दलाच्या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावे अथवा formbpmcfire@gmail.com या इमेलवर पाठवावे. नागरिकांनी आपली जिवित व वित्तहानी रोखण्यासाठी इमारतींमधील उपलब्ध, अग्निशमन यंत्रणा नेहमीच सुस्थितीत व कार्यान्वित राहील याची योग्य ती खबरदारी घेऊन कार्यवाही करावी व पुणे महानगरपालिका अग्निशमन दलास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास वीज आणि पाणीपुरवठा करणार खंडित इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास वीज आणि पाणीपुरवठा करणार खंडित Reviewed by ANN news network on २/१४/२०२४ ०४:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".