पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२४’ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.या स्पर्धेचे दि.९ जानेवारी २०२४ रोजी आयएमईडी, एरंडवणे,पौड रस्ता,पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. एकूण १२१ स्पर्धकांनी भाग घेतला.
नंदिनी रविशंकर ला प्रथम क्रमांक मिळाला. प्रणाली पाटील आणि पराग बडकीरे यांना विभागून द्वितीय क्रमांक मिळाला.अपर्णा पटले आणि देवांशी सिंगला विभागून तृतीय क्रमांक मिळाला.प्रसिद्ध हास्यकलाकार,निवेदक बंडा जोशी यांनी स्पर्धेचे उदघाटन केले.भारती विद्यापीठ आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे,उप प्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. रेशु अगरवाल आणि श्रीमती रुमा यांनी परीक्षण केले.
या स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्रमांकास रुपये बारा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास आठ हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
‘गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन ’, ‘पत्रकारिता -सामाजिक प्रबोधन ’, ‘ आजचे राजकारण आणि समाज ', ‘ सोशल मीडिया -संधी की समस्या’, ‘कामाचे स्वरूप आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स’, ' व्यायाम -शारीरिक आणि मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली ', ' हवामान बदल -शाश्वत पद्धतीची निकड ', ' युद्ध -प्रगती की अधोगती 'हे स्पर्धेचे विषय होते.
या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात डॉ.हेमचंद्र पाडळीकर, डॉ.प्रमोद पवार, डॉ.सचिन आयरेकर,डॉ. विजय फाळके, डॉ.हेमा मिरजी,उदय देसाई, प्रतिमा गुंड यांचा समावेश होता.
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२४ ०८:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: