वाट्टेल तिथे कचरा टाकणार्यांवर महापालिका उगारणार कारवाईचा बडगा!; कारवाईसाठी नवी १८ वाहने पालिकेच्या ताफ्यात
पुणे : पुणे महापालिका हद्दीत कचरा वाटेल तिथे टाकणे आता नागरिकांना महागात पडणार आहे.कचरा टाकणार्यांवर नियंत्रण टाकणार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारीपथकांसाठी १८ वाहने पालिकेच्या ताफ्यात रुजू होत आहेत.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी एक आणि मुख्य खात्यासाठी तीन अशी एकूण १८ वाहने सेवेत दाखल होत आहेत.
ऑक्टोबर २०१७ पूर्वी पुणे शहरात दररोज सुमारे १ हजार ७०० टन कचरा निर्माण होत होता. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावे व जुलै २०२१ पासून २३ गावे नव्याने समाविष्ट झाल्याने सध्या दररोज सुमारे २ हजार ३०० टन कचरा निर्माण होत आहे.
केंद्र सरकारने २०१६ साली घनकचरा व्यवस्थापन नियम जारी केले. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. आता या नियमांची अंमलबजावणी करणे सोपे होणार असल्याचे पालिकाप्रशासनाचे म्हणने आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: