‘लोकशाही’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला!

 


मुंबई : लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या जबरदस्त ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांने रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास ट्रेलरमधून दिसत आहे. या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडणार आहे. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे लोकशाही चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होताना दिसत आहे. 

चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा चित्रपटाचे निर्माते सुशीलकुमार अग्रवाल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, तेजश्री प्रधान, अमितरियान आणि सर्व कलाकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला. मोहन आगाशे यांनी ‘चित्रपट निर्मितीची प्रक्रिया धमाल मजेदार होती’ असं सांगितलं असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची त्यांना प्रचंड उत्सुकता आहे. संगीत दिग्दर्शक संजय राजी या जोडीमधील राजी यांनी 'सख्या रे' हे सुमधुर आणि जयदीप बागवडकर यांनी 'ओ भाऊ' हे उत्साही गाणं गाऊन सोहळ्यातील उपस्थितांची मने जिंकली.

"गेली चाळीस वर्ष अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय सिनेसृष्टीत सिडी डिविडीपासून ओटीटीपर्यंत बदलत्या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत दिमाखात आपलं अस्तित्व टिकवून आहे. लोकशाही हा राजकारणातील अराजकता टिपणारा आणि घराणेशाही व्यवस्थेवर बोट ठेवणारा प्रभावी चित्रपट आहे." असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीकुमार अग्रवाल म्हणाले.

‘लोकशाही’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला! ‘लोकशाही’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात पार पडला! Reviewed by ANN news network on १/३१/२०२४ ०४:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".