पुणे: इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिसेस अॅकॅडमीच्या माध्यमातुन कोंढवा स्थीत बैतूल उलम या मदरशात दिनांक १४ जानेवारी पासून विनामूल्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले जाणार असल्याची माहिती इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिसेस अॅकॅडमीचे संस्थापक असलम बागवान यांनी दिली.
सरकारी,निम सरकारी,पोलीस,सेना या मध्ये कसा भाग घ्यावा, युपीएससी, एमपीएससी,एस एस सी सी जी एल, बॅकिंग क्षेत्र इत्यादी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा कशा द्याव्यात .त्याचा अभ्यासक्रम तथा मुलाखतीची तयारी कशी असावी,याचे मोफत प्रशिक्षण दररोज सलग देण्याचा उपक्रम इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिसेस अॅकॅडमीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान हे करणार आहेत.
सच्चर कमिटी,खान कमिटी, रंगनाथ मिश्रा कमिटी यांच्या अहवालानुसार मुस्लिम समाज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय तथा विविध क्षेत्रात अती मागास असून या समाजाची अवस्था आदिवासी पेक्षाही मागास आहे.
मदरशात फक्त धार्मिक शिक्षणच न घेता त्यांना व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच तत्यांना धार्मिक कार्य हेच व्यवसायाचे साधन न पत्करता इतरही सरकारी नोकरीत त्याचे योगदान होवून मदरशाबाबत असलेल्या काही गैरसमज यातून दूर करण्याचा प्रयत्न या उपक्रमात राहणार असल्याची माहिती बैतूल उलम चे संचालक मुफ्ती शाकीर यांनी दिली
हा उपक्रम अतिशय स्वागतार्ह असून याचे अनुकरण सर्व मदरशात व्हावे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
Reviewed by ANN news network
on
१/१३/२०२४ ०९:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: