गद्दारांना लोकसभा, विधानसभेच्या पायर्‍या चढू देऊ नका! : आदित्य ठाकरे

 


तळेगाव दाभाडे : महाराष्ट्रातील सर्व उद्योग राज्यकर्ते गुजराथमध्ये नेत आहेत. आणि राज्यशासन मात्र गप्प आहे. असंवैधानिक सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ते मंत्रालय आणि तहसील कार्यालयेही गुजराथमध्ये नेतील. त्यामुळे; या देशद्रोह्यांना पुन्हा लोकसभा अथवा विधानसभेच्या पायर्‍या चढू देऊ नका असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मावळातील जनतेला केले.

आज रविवारी आदित्य ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून मावळ तालुक्यातील लोणावळा येथून त्यांच्या दौर्‍याचा प्रारंभ झाला. लोणावळ्यात शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

 यानंतर तळेगाव दाभाडे येथे आदित्य ठाकरे यांच्या स्वागतसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ संघटक संजोग वाघेरे, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.शैलेश मोहिते-पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

शैलेश मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे असून त्यांनी  महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, सरचिटणीस माजी उपाध्यक्ष,उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपचे निरीक्षक आदी जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

गद्दारांना लोकसभा, विधानसभेच्या पायर्‍या चढू देऊ नका! : आदित्य ठाकरे गद्दारांना लोकसभा, विधानसभेच्या पायर्‍या चढू देऊ नका! : आदित्य ठाकरे Reviewed by ANN news network on १/२१/२०२४ ०३:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".