आर्थिक व्यवहारावरून रंगा-याचा खून करणारे ६ अटकेत

 


मुख्य सूत्रधाराला वाचविण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप करत उत्तरभारतीयांचा रास्तारोको

पिंपरी : आर्थिक व्यवहारावरून एका परप्रांतीय रंगा-याचा २६ जानेवारी रोजी काहीजणांनी  बेदम मारहाण करून खून केला या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने १२ तासात ६ आरोपींना अटक केली. दरम्यान या प्रकरणी पोलीस मुख्य सूत्रधाराला अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप करत काळेवाडी परिसरात उत्तरभारतीयांनी रास्तारोको आंदोलन केले.

भुवाल ऊर्फ मनोज जगदीश मौर्या  असे मृताचे नाव आहे.त्याची पत्नी लालमुनी मौर्या हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी  १) शुभम दिलीप वाल्हेकर वय २७ वर्षे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे २) सागर जगन जाधव वय २७ वर्षे रा. रहाटणी फाटा पुणे ३) कुणाल सुरेश भरम वय २३ वर्षे रा. वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ४) सौरभ राजेंद्र वाघमारे वय २५ वर्षे रा. वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे ५) अक्षय लक्ष्मण पाटील वय २३ वर्षे रा. बिजलीनगर चिंचवड पुणे ६) दिनेश रामेश्वर मस्के वय २७ वर्षे रा. चिंचवड पुणे यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली  आहे. वाकड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ८४/२०२४ भादविक ३६४,३०२, २०१, १४३, १४५, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करून  त्यांना अटक केली आहे. आरोपींना  कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना  ०७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मनोज मौर्या याने आरोपी शुभम वाल्हेकर याचेकडून पेंटींगचे कामाकरीता घेतलेले पैसे परत देत नव्हता व त्यांचे काम देखील करीत नव्हता.त्यामुळे शुन्हम याने त्याला आपल्या इनोव्हा कारमध्ये कोंबून त्याला वाल्हेकरवाडी येथील पञाशेडमध्ये आणले. आरोपी कुणाल भरम व सौरभ वाघमारे यांनी त्चेया हात पाय बांधले.कुणाल वाल्हेकर मृताला तू माझे पैसे दे नाहीतर तुला मारणार अशी धमकी दिली. त्यानंतरही  मृत मनोज मौर्य माझेकडे पैसे नाहीत असे म्हणाला. त्यामुळे आरोपी शुभम वाल्हेकर, सागर जाधव, आकाश धापटे, कुणाल भरम, सौरभ वाघमारे, दिनेश मस्के यांनी त्याला पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. तो बेशुद्ध झाल्यानंतर दिनेश मस्के व अक्षय पाटील  या दोघांनी त्याला एमएच. १४. जीसी. ३१९० या क्रमांकाच्या रिक्षात घालून महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात टाकून पळून गेले. रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी पोलिसांना कळविले पोलिसांनी त्वरेने हालचाल करून आरोपींना अटक केली. 

मात्र, या प्रकरणात मृताला मारहाण करण्यास लावणारी खरी सूत्रधार एक आर्किटेक्ट महिला असून तिला पोलीस या प्रकरणातून वगळत आहेत असा आरोप करत उत्तरभारतीयांनी मृतदेह रस्त्यात ठेवूनन रास्तारोको केला. 

ही कारवाई  विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त,  डॉ. संजय शिंदे, सह आयुक्त,  वसंत परदेशी, अपर  आयुक्त,  बापु बांगर ,उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, डॉ. विशाल हिरे, सहा.आयुक्त, वाकड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली  गणेश जवादवाड, वरिष्ठ निरीक्षक, विठ्ठल साळुंखे, निरीक्षक (गुन्हे), उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द् सावर्डे, सहाय्यक फ़ौजदार. बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, हवालदार संदीप गवारी,  वंदु गिरे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दिपक साबळे, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, नाईक. रामचंद्र तळपे, शिपाई भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, सागर पंडीत यांनी  केली.

आर्थिक व्यवहारावरून रंगा-याचा खून करणारे ६ अटकेत आर्थिक व्यवहारावरून रंगा-याचा खून करणारे ६ अटकेत Reviewed by ANN news network on १/२७/२०२४ ०९:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".