सर्वच प्रकल्प महाराष्ट्रातून शेजारच्या राज्यात पळवले जात आहेत : आदित्य ठाकरे

 


‘हृदयात राम; हाताला काम असं आमचं हिंदुत्व’

पिंपरी  :  ‘आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम’ असं आहे.असे स्पष्ट करत आदित्य ठाकरे यांनी आपला श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोहाबाबत आपला दृष्टीकोन स्पष्ट केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा पिंपरी येथे आज २१ जानेवारी रोजी झाली. त्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते.

यावेळी यावेळी शिवसेना नेते सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लोकसभा मतदार संघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील, पुणे जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मीनल यादव आदी उपस्थित होते.

या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी आरक्षणाबद्दल दिलेली आश्वासने, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजराथमध्ये नेणे, जाती धर्मातील वाढती दरी यासारख्या मुद्द्यांना स्पर्श केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, आता सत्तेत असणारे पहिल्याच बैठकीत आरक्षण देऊ असे सत्तेत येण्यापूर्वी म्हणत होते.मात्र, आता राज्यभरात आरक्षणाचे आंदोलन पेटत चालले आहे. या आश्वासनाचे काय झाले? महागाई संपविण्याचे आश्वासनही सत्ताधार्‍यांनी दिले होते. सर्वत्र महागाई वाढतच चालली आहे. याविषयी विचारले तर ७० वर्षांपूर्वी त्यांनी काय केले होते असा प्रतिप्रश्न करतात.किती वर्षे तेच तेच उगाळत बसणार आहात? अशी टीका विद्यमान सरकारवर ठाकरे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, ४० गद्दार जसे सुरतेला पळाले. तसे सर्वच प्रकल्प महाराष्ट्रातून शेजारच्या राज्यात पळवले जात आहेत. महाराष्ट्रातून पळवलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प अखेर रद्द झाला. कारण गुजराथमध्ये तो उभारण्यासाठी ७ वर्षे लागणार होती. कंपनीने प्रकल्प उभारण्याचे रहीत केले. यात नुकसान महाराष्ट्रातील, देशातील बेरोजगार तरुणांचे झाले. हा देशद्रोहच नाही का? तुम्हीच सांगा खरे देशद्रोही कोण?

सध्याच्या सत्ताधार्‍यांचा फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खटाटोप सुरू आहे. अशी टीकाही त्यांनी केली.

ते म्हणाले, जाती धर्मातील दरी वाढत चालली आहे. हे धोकादायक आहे. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव केले.पण, कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत.

या सभेला मोठ्यासंख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

सर्वच प्रकल्प महाराष्ट्रातून शेजारच्या राज्यात पळवले जात आहेत : आदित्य ठाकरे  सर्वच प्रकल्प महाराष्ट्रातून शेजारच्या राज्यात पळवले जात आहेत : आदित्य ठाकरे Reviewed by ANN news network on १/२१/२०२४ ०९:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".