श्रीरामाप्रमाणे धर्मरक्षणाचे कर्तव्य प्राणपणाने प्रयत्न करण्याची हिंदूनी घेतली प्रतिज्ञा!
चिपळूण : पाचशे वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे पुन्हा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरी जिल्हयात राजापूर,रत्नागिरी,लांजा, दापोली, खेड आदि तालुक्यात ठिकठिकाणी श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबविण्यात आले.
जिल्ह्यातील चिपळूण, कळंबस्ते येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता , श्रीराम प्रतिमा पूजन, आरती, नामजप , "आदर्श राजा प्रभू श्रीरामचंद्र" विषयावर प्रवचन आणि रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा असा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित हिंदू बंधू भगिनी यांनी श्रीरामा प्रमाणे धर्मरक्षणाचे कर्तव्य प्राणपणाने प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली.
याप्रसंगी "आदर्श राजा प्रभू श्रीरामचंद्र"या विषयावर धर्मप्रेमी श्री आदित्य तांबे यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले. तसेच श्रीराम नामजप करून घेतला. श्री. प्रदीप तांबे आणि सौ. मेघना प्रदीप तांबे यांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. डॉ. हेमंत चाळके यांनी हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाच्या नियोजनात धर्मप्रेमी श्री. कमलाकर मोरे, प्रभाकर खराडे, श्रीमती कमल भुवड, सौ. संगीता नागवे, श्री. मधुकर शिंदे, धनंजय अष्टेकर यांनी सहभाग घेतला.
Reviewed by ANN news network
on
१/२५/२०२४ १०:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: