पुणे : जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने येत्या बुधवारी 31 जानेवारी हॉटेल रामी ग्रँड येथे व्हिजन पुणे शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
मुळीक म्हणाले, पुणे हे देशातील वेगाने विकसित होणारे महानगर आहे. ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी शहराची ओळख असून, उद्योग व आयटी क्षेत्रातही शहर आघाडीवर आहे. उद्योजकांना आकर्षित करणारे शहर आणि वास्तव्यासाठी पुणे देशातील दुसरे सर्वात योग्य शहर ठरले आहे. वास्तव्याची सुविधा, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अर्थव्यवस्था, सुरक्षितता, पर्यावरण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्था, स्वच्छता, पायाभूत सुविधा, महसूल व्यवस्थापन, वित्तीय जबाबदाऱ्या, वित्तीय विकेंद्रीकरण, ई गर्व्हनन्स, डिजिटल साक्षरता, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभागाबरोबरच मनुष्य संसाधन आणि प्रभावीपणा अशा पूरक बाबींचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्ती या परिषदेत सहभागी होऊन पुणे शहरासाठीचे धोरण ठरविण्यासाठीचा आराखडा तयार करणार आहेत.
मुळीक पुढे म्हणाले, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सुधीर मेहता, अनिरुद्ध देशपांडे, राजेश पांडे, पत्रकार सुनील माळी, संजय आवटे, सम्राट फडणीस, शितल महाजन, अभय कुलकर्णी, अभय भुतडा, सुधाकर आव्हाड या परिषदेत सहभागी होणार आहेत. पुण्याच्या सर्वांगीण, शाश्वत विकासाची दिशा ठरविण्यासाठी पुणेकरांना आपल्या संकल्पना 30 जानेवारीपर्यंत 8390115599 या क्रमांकावर पाठविता येणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
१/२९/२०२४ ०४:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: