मुंबई : महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झाली. मुंडे हे कोरोनाग्रस्त असल्याने गृहविलगीकरणात आहेत.
या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषी मंत्री श्री. मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सदस्य डॉ. विवेक दामले, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक हेमंत पाटील. डॉ. हरिहर कौसडीकर आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची ११३ वी बैठक पार
Reviewed by ANN news network
on
१२/२६/२०२३ ०८:३७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/२६/२०२३ ०८:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: