विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, जेएनपिटीचे कर्मचारी, वारकरी संप्रदाय, स्वाध्याय परिवाराचे उपासक, प्रवचनकार मनोज दामोदर घरत यांचे मंगळवार दि १२ डिसेंबर २०२३ रोजी दुःखद निधन झाले.
ते जेएनपीटी प्रशासकीय विभागात वरिष्ठ अधिकारी होते. मृत्यू समयी त्यांचे वय ५९ होते. त्यांची अंत्यविधी डोंगरी उरण येथे झाली. त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा १० वा श्री क्षेत्र माणकेश्वर तर १३ वा दिनांक २४/१२/२०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरी द्रोणागिरी मध्ये संपन्न झाला.
मनोज यांना आई,२ भाऊ,३ बहिणी होत्या. तसेच पत्नी,१ मुलगा,१ मुलगी,१नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे .काँग्रेस उरण तालुका महिलाध्यक्ष रेखा घरत यांचे ते पती होते. मनोज घरत यांच्या जाण्याने संपूर्ण उरण तालुक्यात व घरत परिवार, मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.मनमिळावू, समजूतदार , सर्वांशी प्रेमळ वागणारे असल्याने मनोज घरत यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण उरण तालुक्यात हळ हळ व्यक्त केली जात आहे.
मनोज दामोदर घरत यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
१२/२५/२०२३ ०९:२३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/२५/२०२३ ०९:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: