विमाननगरमध्ये गॅससिलेंडर्सचे स्फोट


पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात आज दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडर्सचे स्फोट झाले. त्यामुळे आग लागली. अद्याप या स्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अग्निशमनदलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

विमाननगर येथील सिंबायोसिस कॉलेजजवळ असलेल्या रोहन मिथिला इमारतीशेजारी एक पत्र्याची शेड असून या शेडमध्ये १०० गॅस सिलेंडर्स ठेवण्यात आले होते. त्यापैकी १० सिलेंडर्सचे स्फोट झाले असल्याचे वृत्त आहे. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.पत्र्याची शेड आणि गॅस सिलेंडर्सचा साठा अनधिकृत असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

विमाननगरमध्ये गॅससिलेंडर्सचे स्फोट  विमाननगरमध्ये गॅससिलेंडर्सचे स्फोट Reviewed by ANN news network on १२/२७/२०२३ १०:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".