संरक्षक दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी उडचलो (udChalo) द्वारे सर्वसमावेशक आर्थिक सेवा

 


पुणेसंरक्षक दल आणि त्यांच्या परिवार जनांसाठी समर्पितपणे कार्य करणारी अग्रगण्य ग्राहक तंत्रज्ञान कंपनी उडचलोने (udChaloसंरक्षक दलातील कर्मचाऱ्यांना ज्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते त्यास तोंड देता यावे म्हणून आर्थिक नियोजन सेवांचा एक सर्वसमावेशक संच सादर केला आहेकंपनीने आर्थिक-तंत्रज्ञान विषयक उपाययोजनांचे (फिनटेक सोल्यूशन्स) ‘बचत’(सेविंग्सआणि ‘गुंतवणूक’ (इन्व्हेस्टमेंटअशा दोन व्यापक प्रकार आणले आहेत, जे त्यांना संपूर्ण आणि सर्वसमावेशक असे आर्थिक सेवांचे सहाय्य देतीलकर्जापासून गुंतवणुकीपर्यंत, कर बचतीपासून अन्य आर्थिक विषयांपर्यंत वेगवेगळे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीने घेण्यासाठी संरक्षण दलातील लोकांना उडचलो (udChaloप्रदान करत असलेले उपाय सक्षम करतील.  

बचत’(सेविंग्सच्या क्षेत्रात उडचलो (udChaloकर भरण्याच्या सेवा देते आणि ग्राहकांना अधिक चांगल्याप्रकारे बचत करण्यासाठी अधिकाधिक सवलतींचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करतेअति कर्जातून होणारा तोटा ओळखून उडचलो (udChaloने अशा संस्थांबरोबर भागीदारी केली आहे ज्या बऱ्याच कमी व्याजदरामध्ये कर्ज देतातयामुळे ग्राहक मोठ्याप्रमाणात बचत करू शकतातविचारपूर्वक ‘गुंतवणूकीसाठी उडचलो (udChaloने बँकांमध्ये मुदत ठेवीपासून सुरुवात केली आहेज्यामध्ये संरक्षक दलातील कर्मचारी,  बँकांच्या शाखांना वारंवार प्रत्यक्ष भेट देण्याचा त्रास टाळून, अन्य सामान्य  बँकांपेक्षा सरासरी जास्त कमवू शकतातया ठेवी रिझर्व्ह बँकेकडून पाच लाखांपर्यंत संरक्षित असतीलयाशिवाय, कंपनी लौकरच म्यूच्युअल फंड देखील सादर करणार आहे; जे त्यांच्या आयुष्यातील जी ध्येये आहेत त्यांच्यानुसार अनुकूलित केले जाईल आणि जे त्यांना स्वतःच्या किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, सेवानिवृत्तीनंतर व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा एक चांगला आर्थिक पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी मदत करेल.

            या पुढे जाऊन, रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीचे महत्व देखील लक्षात घेऊन कंपनी आपल्या ग्राहकांना त्या क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे आणि अनेक शहरांमध्ये किफायतशीर घरांचे पर्याय देऊन सहकार्य करत आहेयातून त्यांना कर बचतीच्या सर्व पर्यायांपैकी सर्वाधिक म्हणजे . लाखांपर्यंतची कर सवलत मिळविण्याची संधी मिळतेयामुळे दीर्घकाळामध्ये ५४एफ भांडवली नफा कर सवलतींमधून लाभ घेता येईल.  नाहीतर कदाचित हा लाभ उशिरा केलेल्या रिअल इस्टेटमधील गुंतवणूकीमुळे ते गमावू शकतात.

उडचलो (udChaloचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीरवी कुमार याबाबत म्हणाले, विशेषतः लौकर सेवानिवृत्तीची शक्यता आणि त्यांच्या सतत वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने आमच्या संरक्षण दलांसाठी धोरणात्मक आर्थिक नियोजन अत्यावश्यक आहेआपल्या या शूरवीर जवान आणि वीरांगनांना दुर्गम  आव्हानात्मक अश्या प्रदेशांमध्ये काम करावे लागत असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये फारशी आर्थिक जागरूकता नसल्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना सेवानिवृत्तीनंतर करीअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागतोयोग्य आर्थिक मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांनी मेहनतीने मिळवलेली कमाई अनेकवेळा धोक्यात येतेआपल्या संरक्षक दलातील जवानांचे जीवन सुखकर करण्यासाठी उडचलो (udChaloकटिबद्धता आहे. ही वचनबद्धता त्यांच्या खास आर्थिक गरजा पूर्ण करण्यापर्यंत विस्तारलेली आहेआपल्या सैनिकांना त्यांच्या सेवेच्या काळात आणि सेवानिवृत्तीनंतर देखील अखंड आर्थिक सुरक्षिततेचा आनंद घेता यावा यासाठी अथक प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहेअसे करून आम्ही त्यांना आर्थिक तणाव  घेता आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम करतो.”

संरक्षण दलातील जवान बहुतांशवेळा लौकर सेवानिवृत्त होतातम्हणजे वयाच्या ३५ व्या वर्षी देखील ते निवृत्त होतातत्यावेळेस त्यांची मुले लहान म्हणजे अगदी शाळेत असतातत्यामुळे अशावेळी जवानांचे आयुष्य सोपे  सुखकर करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या उडचलो (udChaloने प्रवास, परिवर्तन किंवा गतिशीलता (मोबिलिटी), गृहनिर्माण, आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेकआणि अजून अशा बऱ्याच क्षेत्रांना समाविष्ट करुन आपल्या सेवांचा विस्तार केला आहे.

संरक्षक दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी उडचलो (udChalo) द्वारे सर्वसमावेशक आर्थिक सेवा संरक्षक दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी उडचलो (udChalo) द्वारे  सर्वसमावेशक आर्थिक सेवा Reviewed by ANN news network on ११/०१/२०२३ ०८:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".