बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी : "आपल्या वृत्तीतील, सृजनतेला जागरूक ठेवा , त्यासाठी वेगवेगळे साहित्य वाचत जा आणि त्यातून प्रेरणा घेऊन, स्वतः सुध्दा लिहीते व्हा" असे आवाहन, शब्दरंग कला साहित्य कट्टया तर्फे, प्रकाशित होत असलेल्या, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असताना , ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती श्यामला खळदकर यांनी केले.
दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असताना, त्या मध्ये साहित्य देणाऱ्या सर्व २४ लेखकांच्या लेखनशैली बद्दल गौरवोद्गार काढत असताना, काही मौलिक सूचना सुध्दा केल्या, ज्यायोगे भविष्यात, अंकाची पृष्ठसंख्या तर वाढेलच, शिवाय अजूनही काही लेखक आपले साहित्य देण्यासाठीप्रवृत्त होतील असे मत व्यक्त केले .
दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यमान अध्यक्षा ज्योती कानेटकर यांनी सर्वांचे स्वागत केले.संस्थापक अध्यक्ष, चंद्रशेखर जोशी यांनी प्रास्ताविकात, कट्टयाच्या, गेल्या अडीच वर्षामधील उपलब्धीचा गोषवारा कथित केला.
संपादकीय मंडळाचे सदस्य, सुभाष भंडारे यांनी या अंकाच्या प्रकाशना बाबतीतील भूमिका यथोचितरित्या विशद केली.
संपादक, वसंतराव देशपांडे यांनी अंक छपाई साठी अनेकांनी केलेल्या सहकार्याची आवर्जून दखल घेतली आणि सर्वांना धन्यवाद दिले. अंकाची, उत्कृष्ट पणे मांडणी करणारे व अत्यंत हौसेने हे काम तडीस नेणारे, श्रीकृष्ण धारप यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले. अशोक अडावदकर यांनी आभार मानले.
या प्रकाशन सोहळ्यास कट्टयाचे सभासद, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
प्राधिकरणातील शब्दरंगच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२३ ०७:३०:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२३ ०७:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: