महापालिकेतील माहिती अधिका-यांसाठी यशदा संस्थेमार्फत प्रशिक्षण

 


पिंपरी :  नागरिकांनी माहितीच्या  अधिकारात मागवलेली माहिती देणे बंधनकारक असून शासकीय कर्मचा-यांनी माहिती  देताना सकारात्मक दृष्टीकोनातून  आणि विश्वस्थांच्या   भूमिकेतून कृती केली पाहिजे. असे मत यशदा संस्थेचे प्रशिक्षण व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी दादा बुले यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कामगार कल्याण विभाग आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कायदा २००५ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना  ते बोलत होते. 

या प्रशिक्षणास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,  सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदेमाहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगतापउप अभियंता हरविंदरसिंग बन्सल तसेच यशदा संस्थेच्या  मुख्य प्रशिक्षक  रेखा साळुंखे आणि विविध विभागातील माहिती अधिकारी उपस्थित होते. 



कार्यालयीन कामकाजात अडचणी येऊ नये यासाठी माहिती अधिकारातील काही महत्वाच्या बाबी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार नाही तसेच  जेव्हा कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे सामान्य नागरिक माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती घेण्यासाठी येतो किंवा त्याला कोणती माहिती हवी आहे ती  संबंधित माहिती पुरविणे ही त्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याची जबाबदारी आहे असेही  अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले. 

यावेळी मुख्य प्रशिक्षक दादू बुले यांनी माहिती अधिकार कायदा २००५ बद्दल सविस्तर माहिती सांगितली तसेच माहितीचा अधिकार कायद्याचा उद्देश हा प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणेनागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढविणेराज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणेशासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रति उत्तरदायित्व निर्माण करणेराज्यकारभारातील व व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घालणेमाहिती मिळविण्यासाठी सुलभ  यंत्रणा उभारणे   हा आहे  असे त्यांनी सांगितले. 

या शिबिरात मुख्य प्रशिक्षक रेखा साळुंखे  यांनी समुचित शासनसमुचित शासनाच्या जबाबदाऱ्यासक्षम प्राधिकारीसार्वजनिक प्राधिकरण अशा विविध बाबींची माहिती वेगवेगळ्या प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगानुसार  उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिली. 

शिबीराचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे  यांनी केले तर सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. 

महापालिकेतील माहिती अधिका-यांसाठी यशदा संस्थेमार्फत प्रशिक्षण महापालिकेतील माहिती अधिका-यांसाठी यशदा संस्थेमार्फत प्रशिक्षण Reviewed by ANN news network on ११/०३/२०२३ ०८:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".