मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील डिलाईल रोड पुलाच्या मार्गिकेचे परस्पर उद्घाटन केल्यामुळे मुंबई महापालिकेतर्फ़े मुंबईतील ना. म. जोशी पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली असून त्यावरून आदित्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
महापालिकेने डिलाईल रोड पुलाच्या मार्गिकेचे काम केले होते. सात दिवसात या मार्गिकेचे उद्घाटन करण्याचे पालिकेचे नियोजन होते.तथापि आदित्य यांनी त्या पूर्वीच या मार्गिकेचे उद्घाटन केले. त्यावरून वाहतूक सुरू झाली. इतर कामे पूर्ण झालेली नसताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आदित्य यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली. त्यावरून शासकीय कामात अडथळा आणणे आणि जमाव जमवणे, या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदित्य यांच्यासह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
दरम्यान हा सर्व प्रकार राजकीय दबावाखाली आणि राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे शिवसैनिक करत आहेत. या प्रकारावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ०९:२५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: