पंढरपूर : कार्तिकी एकादशीची यात्रा जवळ आली असतानाच पंढरपुरात झिका व्हायरसची लागण झालेला संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे.
हा रुग्ण मुंबईहून पंढरपूर येथे आला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून त्या रुग्णांच्या निकटच्या चार व्यक्तींसह परिसरातील गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असल्याचे समजते.
झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास मळमळ होणे, डोके दुखणे, ताप येणे अशी अशी डेंग्यूसदृष्य लक्षणे दिसून येतात. त्याचा प्रसार डासांमार्फ़त होतो.
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे ही चिंता वाढविणारी बाब ठरली आहे.
कार्तिकी एकादशीजवळ आली असतानाच पंढरपुरात आढळला झिकाचा संशयित रुग्ण!
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ०९:५६:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१८/२०२३ ०९:५६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: