पवनानदीत प्रदूषित पाणी सोडणा-या कंपनीवर गुन्हा दाखल

 


पिंपरी :  केजूदेवी बंधारा थेरगाव येथे मागील काही दिवसांपासून पवना नदीमध्ये पांढऱ्या रंगाचा फेस तयार होवून दुर्गंधी येत आहे. या अनुषंगाने पर्यावरण व जलनि:सारण विभागाच्या वतीने ताथवडे भागात सर्वेक्षण करत असताना असे आढळून आले कीताथवडे येथील २४ क्लेन (मेसर्स क्लेनफॅब सर्विसेस एल. एल. पी) या ड्रायक्लिनर्सच्या कंपनीने ड्रायक्लिन करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता महापालिकेच्या जलनि:सारण नलिकेस विना परवाना जोडले होते. सदर रसायनयुक्त पाणी हे काळपट निळसर व फेसयुक्त होते.

          सदर ड्रायक्लिन कंपनीच्या मालकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई ही जलनि:सारण व पर्यावरण विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य निरिक्षक अमोल गोरखेगोरक्षनाथ करपेकनिष्ठ अभियंता संदिप पाडवीसचिन मगर यांच्या वतीने करण्यात आली.

यापुढेही अशी कारवाई चालू राहणार असून अशा प्रकारच्या नदी प्रदूषण करणा-या व्यक्ती आढळून आल्यास त्यांचे विरूद्ध कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी देखील असे आढळून आल्यास महापालिकेस त्वरित कळवावे असे आवाहन करण्यात येत आहे.

पवनानदीत प्रदूषित पाणी सोडणा-या कंपनीवर गुन्हा दाखल पवनानदीत प्रदूषित पाणी सोडणा-या कंपनीवर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ११/१०/२०२३ ०८:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".