विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील नवीन शेवा गावचे सुपुत्र हेमंत म्हात्रे हे नेहमी चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. आजपर्यंत अनेक लोकहीतउपयोगी अनेक कार्यक्रम, उपक्रम हाती घेउन ते पूर्ण केले आहेत. कोणताही गाजावाजा न करता अनेक गोर गरिबांना ते मदत करत असतात. आता एका चांगल्या कार्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
शिवराय चौक द्रोणागिरी शहर नविन शेवा येथील जय शिवराय चौकला बॅनर आणी काटेरी झुडपे यांनी विळखा घातला होता. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र सैनिक हेमंत म्हात्रे यांनी या चौकाची साफसफाई केली आहे.चौकची साफसफाई केल्याने वाहनांना योग्य रित्या प्रवास करणे सोप्पे झाले आहे. आणि अपघाताचे प्रमाण सुद्धा यामुळे कमी होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी हेमंत म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.
उरण : सामाजिक कार्यकर्ते हेमंत म्हात्रे यांनी केली जय शिवराय चौकाची साफसफाई
Reviewed by ANN news network
on
११/२१/२०२३ ०७:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२१/२०२३ ०७:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: