विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाची निवड

 


 भोसरी :  कडलास हायस्कूल सांगोला जि.सोलापूर येथे  १७ व १८ नोव्हेंबर रोजीेहोणाऱ्या शालेय विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी लांडेवाडी, भोसरी  येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील  १९  वर्षाखालील मुलांच्या संघाची निवड करण्यात आली आहे. 

ही निवड  तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय भोसरी या संघाचा २४-१५अशा ९ गुणांच्या फरकाने पराभव करत प्रथम क्रमांक मिळविला असल्याने   करण्यात आली आहे.

राजमाता जिजाऊ मुलांच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले आहे. सदर संघातील  ओंकार शिंदे,  कृष्णा काळभोर,  सुभरकांत दास, विक्रम परमार यांनी आक्रमक चढाया करत तसेच डावा पाचवा कोपरारक्षक अनुज गावडे, उजवा पाचवा कोपरा रक्षक अनिकेत तापकीर, विभांशू चव्हाण, सर्वज्ञ भोसले यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच उपांत्य फेरीतील ज्ञानभक्ती ज्युनिअर कॉलेज डुडूळगांव या संघाचा १३-८ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सदर संघात ओंकार जगताप,सर्वज्ञ भोसले, विक्रम परमार, गणेश जाधव, साहिल यादव,श्रवण लोयरे,अनुज गावडे,ओंकार शिंदे ,कृष्णा काळभोर, सुभरकांत दास,अनिकेत तापकीर, विभांशू चव्हाण या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी  मार्गदर्शन केले.

        या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार विलास  लांडे यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित  गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त व नगरसेवक विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. कानडे , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले.
विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाची निवड विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाची निवड Reviewed by ANN news network on ११/१७/२०२३ ०१:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".