चित्रकारांच्या गटाकडून दुर्गम भागात दिवाळी सरंजाम भेट

 


पुणे : पुण्यातील तरुण चित्रकारांच्या गटाने चित्रकार सुरेंद्र कुडपणे आणि धनश्री काळे यांच्या नेतृत्वाखाली धानिवली वस्ती (ता.भोर) येथे दिवाळी सरंजाम भेट देऊन वंचितांची दिवाळी साजरी केली. या दुर्गम भागात  जेथे गाडी जात नाही अशा ठिकाणी पाच तासाचा प्रवास डोंगरउतार कडे चढुन, उतरून जाऊन हा उपक्रम साजरा केला.

चित्रकारांच्या या गटाकडून दर वर्षी एका वस्तीवर दिवाळी सरंजाम,धान्य,फराळ भेट देवून सामाजिक दृष्टिकोन जपला जातोचित्रकार सुरेंद्र कुडपणे आणि धनश्री काळे यांच्या नेतृत्वाखाली धनश्री काळे, जय कुडपणे, विनोद रघुवीर, राम धानवले यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. महेंद्र थोपटे, सनी कुडपणे, विजय  धनावडे, महेश टेंकाळे, वर्षा रसाळे, रीना शहा,प्रकाश ढगे, कैलास गाढवे, राहुल म्हेत्रे, गायत्री पाटील,रीना शहा,संगीता होनराव, साची होनराव, सई होनराव , अनिकेत देशमुख, धनंजय कोटकर, अमित बेलदरे पाटील, कुणाल बेलदरे पाटील , सौ.देवयानी नलावडे , स्वाती जरांडे ,रामदास कांबळे या सर्वांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. 

चित्रकारांच्या गटाकडून दुर्गम भागात दिवाळी सरंजाम भेट चित्रकारांच्या गटाकडून दुर्गम भागात दिवाळी सरंजाम भेट Reviewed by ANN news network on ११/१७/२०२३ ०१:३३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".