पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील दिघी पोलीसठाण्याच्या पथकाने दोन सराईत मोटारसायकल चोरांना अटक करून त्यांच्याकडून सात मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या मोटारसायकलींची एकूण किंमत ३ लाख ५५ हजार रुपये आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख, वय ३६ वर्षे, रा पगडेवस्ती, मराठी शाळेजवळ, चर्होली खु. ता. हवेली जि. पुणे, मनोज मेहतर सोंदरकर, वय ४० वर्षे, व्यवसाय-बिगारी, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
ही कामगिरी दिघी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील उपनिरीक्षक आर. बी. भंडारे, एस. एम. भदाणे व अंमलदार फलके, पोटे, विंचु, मुकणे, कांबळे, जाधव, जाधव, शिपाई जाधव, कसबे व भोसले यांनी केली.
सराईत मोटारसायकलचोर अटकेत!; ७ मोटारसायकली जप्त
Reviewed by ANN news network
on
११/२१/२०२३ ०८:०२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२१/२०२३ ०८:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: