रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून १५ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण शौर्य’ हे मेनू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ एन.सी.सी. डायरेक्टर ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. ब्रिगेडियर कुलकर्णी यांनी ध्वज दाखवून शिबिरार्थींना मार्गस्थ केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, कमांडर के. राजेश कुमार, कार्यकारी अधिकारी अंकित रवी, कोस्टगार्डचे अधिकारी आदी उपस्थित होते.
२ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसीने अभियान राबवून कोकणातील समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम केले आहे, त्याबद्दल त्यांचे ब्रिगेडियर व्ही.एन.कुलकर्णी यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. तसेच 'कोकण शौर्य' शिबिरात निवड झालेल्या शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या.
स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण अणि सुंदर कोकण हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे राष्ट्रीय स्तरावरील शिबिर पार पडत आहे. या शिबिरासाठी राज्य भरातील एकूण ६० छात्रांची निवड झाली आहे. रत्नागिरी ते रणपार पावस, पूर्णगड, आंबोळगड, विजयदूर्ग आणि देवगड परत याच मार्गाने रत्नागिरी असा २३५ कि.मी.चा सागरी प्रवास सहभागी शिबिरार्थी करणार आहेत. शिबिरा दरम्यान स्वच्छता व सुरक्षित तटाबाबत पथनाट्य, कविता यांच्या माध्यमातून बाजारपेठ, शाळांमधून जनजागृती करण्यात येणार आहे. तटीय स्वच्छतेबरोबरच समुद्रामधील स्वच्छता विशेषत: प्लॅस्टिक निर्मूलन याबाबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२३ ०१:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: