विलेपार्ले येथील प्रेमनगर येथील एस आर ए गैरप्रकाराची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; शिवसेना पदाधिका-यांनी केली पाहणी

 

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथील प्रेमनगर परिसरातील नागरिकांची  झोपडपट्टी पुनर्वसनाच्या (एस. आर. ए.) नावाखाली मोठी फ़सवणूक झाली आहे. या नागरिकांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रामदास कदम आणि विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना सर्व माहिती देत या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी व आपणाला न्याय मिळावा अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

येथील नागरिकांना होणारा त्रास व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी स्थानिक शाखाप्रमुख  निलेश परब व महिला शाखा संघटिका मंगल शिंदे तसेच विभागातील उपशाखाप्रमुख महिला व पुरुष व शिवसैनिकानी सर्वांची भेट घेतली.

नागरिकांनी या बद्दल मुख्यमंत्री आणि सर्व पदाधिकारयांचे आभार मानले.


विलेपार्ले येथील प्रेमनगर येथील एस आर ए गैरप्रकाराची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; शिवसेना पदाधिका-यांनी केली पाहणी विलेपार्ले येथील प्रेमनगर येथील  एस आर ए गैरप्रकाराची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; शिवसेना पदाधिका-यांनी केली पाहणी Reviewed by ANN news network on ११/२६/२०२३ १०:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".