पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या पाचव्या दिवशी १६०० मुली सहभागी

 


 चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी अथलेटिक्स आणि फुटबॉलमध्ये ९०० मुली खेळाडूंचा सहभाग

- चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी शी इज गोल्ड या उपक्रमाद्वारे मुली खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले

 

पुणे :  पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी शी इज गोल्ड या उपक्रमाद्वारे मुली खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले. हा दिवस स्त्री खेळाडूंना सक्षम करत आणि त्यांना प्रोत्साहन देत साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी १६०० मुली खेळाडूंनी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे अथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुद्धीबळ, फुटबॉल (अंडर-१०, अंडर-१२, अंडर-१४, अंडर-१६, अंडर-१८), जिमनॅस्चिक, टेबल टेनिस, टेनिस आणि व्हॉलीबॉल अशा आठ खेळांत भाग घेतला.

अथलेटिक्सच्या विश्वात एसएफए चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदाच भाग घेणाऱ्या ११ वर्षांच्या आर्या फरांदेनं अंडर१२ लांब उडी खेळात लक्षणीय कौशल्य दाखवले. शिक्षकांच्या मदतीने सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीवर मात करत तिने आपल्या गुणवत्तेला साजेसे स्थान मिळवले. आर्याच्या प्रवासाने मार्गदर्शन व तरुण खेळाडूंची चिकाटी वृत्ती नव्याने अधोरेखित केली.

श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जिमनॅस्टिक आणि व्हॉलीबॉल अशा खेळांचे थरारक प्रदर्शन पाहायला मिळाले. खेळाडूंच्या कौशल्याने पूर्ण वातावरण भारलेले होते. दरम्यान टेनिस प्रेमी अंडर-१०, अंडर-१२, अंडर-१४ अशा वेगवेगळ्या वयोगटातील आकर्षक कामगिरीच्या निकालांची वाट पाहात असल्यामुळे उत्सुकतेमध्ये आणखी भर पडली.



चौथ्या दिवसाचे निकाल

  1. अथलेटिक्स, अंडर- १४, मुली ६०० मीटर

सुवर्ण- आरोही पत्मस, हर्षवर्धन हायस्कूल तालेहिप्परगा सोलापूर,

1:56.62 मिनिटे/ 600मीटर

 

रौप्यमिताली भामरे, विखे पाटील मेमोरियल स्कूल, पत्रकार नगर

2:00.51 मिनिटे/600मीटर

 

रौप्यअनुष्का कुंभार, जय हिंद हाय स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिंपरी कॉलनी

2:05.01 मिनिटे /600मीटर

 

अथलेटिक्सअंडर- १६, मुली १०० मी

सुवर्णहंसिका सुंदरम, द बिशप्स को- ड स्कूल, उंड्री

14.50 सेकंद/100मीटर

 

रौप्यसुब्रता गायकवाज, स्पायसर हाय सेकंडरी स्कूल, गणेशखिंड

14.58 सेकंद /100मीटर

 

ब्राँझअनुष्का जैसवाल, डॅफोडिल इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी

1/100मीटर

 

 

  1. बुद्धीबळअंडर-१५ मुली

सुवर्णपलक प्रशांत जाधव, विद्या व्हॅली स्कूल

 

रौप्यसारा देवकर, द बिशप्स को- एड स्कूल, उंड्री

 

ब्राँझरुतू योगेश जामदार, द ऑर्किड स्कूल, बाणेर

 

बुद्धीबळअंडर-१७ मुली

सुवर्णमानसी धनंजय टिळेकर, एस. पी. ज्युनियर कॉलेज, पुणे

 

रौप्य काव्या अरूण, विद्या व्हॅली स्कूल

 

ब्राँझनिशिता रसिक वाघेला, युरो स्कूल, वाकड

 

  1. जिमनॅस्टिकअंडर- ८ मुली बॅलन्स बीम

सुवर्णइरा कुलदीप गोंदाल, सेंट अनीज स्कूल, कॅम्प

 

रौप्यसंस्कृती, कोठारी इंटरनॅशनल स्कूल, खारोळ

 

  1. जिमनॅस्टिकअंडर- १२ मुली बॅलन्स बीम

 

सुवर्णस्वरा पळशीकर, पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव

निकाल: 8.65

 

  1. जिमनॅस्टिकअंडर- १२ मुली बॅलन्स बीम

 

सुवर्णशर्वरी गंजन, वॉलनट स्कूल, शिवणे

निकाल: 10.8

 

रौप्यकाश्वी राळेगावकर, वॉलनट स्कूल, शिवणे

निकाल: 09.00

 

ब्राँझशिवानी कुलकर्णी, मिलेनियम स्कूल, नॅशनल स्कूल, कर्वेनगर

निकाल: 7.25

 

  1. जिमनॅस्टिकअंडर- १० मुली फीमेल फ्लोअर

 

सुवर्णश्रीराम अमोल वाकिंबे,  बाल शिक्षण मंदिर हाय स्कूल, सीबीएसई, मयूर कॉलनी

निकाल: 11.4

 

रौप्यआरूष एस वाडकर, विबग्योर हाय, बालेवाडी

निकाल: 10.1

 

ब्राँझअर्जुन चौधरी, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई

निकाल: 10

पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या पाचव्या दिवशी १६०० मुली सहभागी पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीप्सच्या पाचव्या दिवशी १६०० मुली सहभागी Reviewed by ANN news network on ११/२५/२०२३ ०९:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".